
महावितरणाची ३३ केव्हीची वायर तुटून केबिनवर पडली सुदैवाने तीन कर्मचारी बचावले
लोटे परिसरातील सांडपाणी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या सीईटीपीच्या केबिनवर महावितरणाची ३३केव्हीची केबल अचानक पडली त्यामुळे स्फोट होऊन लाखो रुपये किमतीचे दोन ऑनलाइन मॉनिटर जळून खाक झाले त्यावेळी केबिनमध्ये असलेले तीन कर्मचारी मात्र आश्चर्यकारकरित्या बचावले या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे तारा तुटण्याचा प्रकार घडला.
www.konkantoday.com