अर्जुना नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकल्याने शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्त्याला धोका
राजापूर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मातीचा मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला होता. त्यातून नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने त्या परिसरामध्ये शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. मात्र, त्या ठिकाणी रिटेलिंग वॉल (संरक्षण भिंत) बांधण्याचे चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने गतवर्षी दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही.
www.konkantoday.com