पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा झाडांचे रोप देवून झाला सन्मान रत्नागिरीतील तरुणाचा अनोखा उपक्रम
रत्नागिरी: कोरोना काळात अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांनी एखाद्या वृक्षाप्रकारे सुरक्षेची सावली नागरिकांवर धरली त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून रत्नागिरी तील तरुणाने पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान त्यांना झाडांचे रोप भेट देऊन केला.
गेल्या वर्षी पासून संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले.अशा परिस्थीतीमध्ये पोलीस अहोरात्र रस्त्यावर उतरुन डयुट्या करु लागले. सामान्य नागरिक घरात व पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरुन कोरोनाला हरवण्यासाठी उभे आहेत. ऊन,वारा,पाऊस ह्यामध्ये रत्नागिरीतील पोलीस खचलेला बघायला मिळालेला नाही. याही परिस्थितीत तो आपल कर्तव्य बजावत आहेच. कोकणामध्ये गेल्यावर्षी तसेच यावर्षी वादळ आले या वादळामध्ये पोलिसांनी मात्र ड्युटी सांभाळून वादळामध्ये रस्त्यावर घरावर पडलेली झाडे उचलायला सुद्धा धावले हे सगळ करताना कोरोनामधेही कर्तव्यात कसूर केलीली नाही.
त्यांच्या या अजोड कामाबद्दल कृतज्ञता म्हणून रत्नागिरी तरुण पत्रकार तन्मय दाते यांनी शहरातील नाकाबंदी ठिकाणी असलेले शहरातील मारुती मंदिर,साळवी स्टाॅप,जयस्तंभ, एस.टी.स्टॅण्ड अशा ठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकार्यांचा केला सन्मान केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, परिविक्षाधीन अधिकारी डाॅ.सुदर्शन राठोड, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, विजय जाधव ,पोलीस कर्मचारी रत्नकांत शिंदे,महेश कुबडे,स्वप्नाली चव्हाण, तसेच जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे, पोलीस मित्र जयदिप परांजपे,दिपक माणगांवकर, व शिक्षक व होमगार्ड या सर्वांची कृतज्ञता म्हणून एक सन्मान केला.
यासाठी तन्मय दाते याना त्यांची आई दिपाली दाते, मित्र प्रथमेश भागवत , कौस्तुभ वायंगणकर यांचे सहकार्य लाभले.
www.konkantoday.com