
ऑनलाइनमार्फत कांदा खरेदी पडली महाग ,रत्नागिरीतील महिलेची ४५हजारांची फसवणूक
स्वस्त दरात कांद्याच्या घाऊक खरेदीसाठी जस्ट डायलवरून होलसेल व्यापाऱ्यांची लिस्ट घेतलेल्या व्यापाऱ्याने अँडव्हान्स घेऊन माल न पुरविता रत्नागिरीतील प्राजक्ता प्रवीण किणे या महिलेची ४५ हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार रत्नागिरी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे
रत्नागिरी शहरात राहणाऱ्या फिर्यादी प्राजक्ता किणे यांनी स्वस्त कांद्याच्या खरेदीसाठी जस्ट डायल या साइट्सच्या माध्यमातून होलसेल कांदा व्यापाऱ्यांची लिस्ट मिळवली त्यापैकी एक व्यापारी दया मिश्रा यांच्या महाकाली ट्रेडर यांच्याशी दहा टन कांद्याचा व्यवहार ठरविला या वेळी ४५ हजार अँडव्हान्स व कांदा पोचल्यानंतर ४५ हजार देण्याचा व्यवहार ठरवण्यात आला त्यानंतर त्या व्यापाऱ्यांकडून कांदा ट्रकमध्ये भरल्याचा व्हिडिओ फिर्यादी यांना पाठवण्यात आला त्यामुळे फिर्यादी यांनी सुरुवातीला दहा हजार रुपये अँडव्हान्स भरला त्यानंतर ट्रक ड्रायव्हरने मोबाइलवरून ट्रक निघाल्याचे फोटो पाठविले त्यामुळे फिर्यादी यांनी आणखी पस्तीस हजार रुपये व्यापाराला पाठविले त्यानंतर ट्रकचालकाने पोलिस गाडी अडवत असल्याचे कारण सांगून आणखी पैशांची मागणी केली परंतु फिर्यादी यांनी ट्रक पोहोचल्यावर पैसे देतो असे सांगितले त्यानंतर ट्रकचालकाने परत फोन करून आपण हातखंबा येथे आलो असून आपले उर्वरित पैसे देण्याची मागणी केली परंतु फिर्यादी यांनी माल मिळाल्याशिवाय पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर ट्रक ड्रायव्हर व संबंधित व्यापारी म्हणवणाऱ्या इसमानी आपले मोबाईल बंद केले या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी प्राजक्ता किणे यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com