रत्नागिरी जिल्ह्यात,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रतिनीधीत्व देण्याची धनगर समाजाची मांगणी
रत्नागिरी जिल्ह्यात धनगर समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असुन आजपर्यंत हा द-याखो-यांत छोट्या छोट्या वाड्यावस्त्यांवर राहाणारा हा गरीब समाज रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तापित राजकीय पुढा-यांनी उपेक्षीत ठेवला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांत ३०० पेक्षा अधिक लहान मोठ्या धनगरवाड्या द-याखो-यांत वसलेल्या असुन स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही बहुतांश धनगरवाड्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.राजकीय पुढारी व प्रशासकीय अधिकारी यांचे आजपर्यंत धनगरवाड्यांच्या विकास कामांकडे दुर्लक्ष झाले आहे.
धनगर समाजाचे कर्तबगार लोकप्रतिनीधी जिल्हा परिषद व पंचायत समितीत गेल्याशिवाय धनगर समाजाच्या विकासाला गती मिळणार नाही.रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी या दोन राजकीय पक्षांचे प्राबल्य असुन या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी धनगर समाजाच्या मतांचा वापर करून धनगर समाजाला वा-यावर सोडले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक पंचायत समिती व संपुर्ण जिल्ह्यतून तीन जिल्हा परिषद धनगर समाजाच्या पक्षात सक्रिय काम करत असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळालीच पाहिजे ही धनगर समाजाची वरील दोन्ही पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांकडे आग्रहाची मांगणी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात धनगर समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी काम करणारी अग्रगण्य सामाजिक संघटना,”महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,रत्नागिरी तर्फे वरील धनगर समाजाची मांगणी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांकडे निवेदनाद्वारे पोहचविण्यात आली आहे.
सन २०२२ मध्ये येणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना सन्मानकारक उमेदवारी वरील दोन्ही राजकीय पक्षांकडून न मिळाल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील धनगर समाजाला न्याय मिळविण्यासाठी वेगळ्या पर्यायाचा विचार करावा लागेल असा इशारा धनगर समाज नेते रामचंद्र बाबू आखाडे यांनी दिला आहे.
www.konkantoday.com