
नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणार्या टोळीकडून आणखी एकाची दोन लाख २९ हजार रुपयांची फसवणूक
सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी लावतो असे सांगून एकाची फसवणूक करणाऱ्या टोळीने आणखी एकाची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे काजरघाटी येथील राहणारे फिर्यादीत मोहित नार्वेकर यांना देखील या टोळीने नोकरीचे आमिष दाखवून त्यांचेकडून दोन लाख २९हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे त्यानी याबाबत शहर पोलीस स्थानकात तक्रार केल्यावर पोलिसांनी प्रगती पाटील ,पाथरे(पूर्ण नाव माहित नाही ),रायकर (पूर्ण नाव माहित नाही ),साई विलणकर,कुणाल बारगुडे, हानिफ झारि या सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
यातील फिर्यादी मोहित यांना या आरोपींनी सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी लावतो असे सांगून त्याला नोकरीचे आमिष दाखवले त्यांचा व घरच्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर मोहित यांच्याकडून साई पिलणकर यांनी उसने पैसे वेळोवेळी घेतले तसेच यातील आरोपी कुणाल बारगुडे व हानिफ झारी यांच्या गुगल पे अकाउंटवर पैसे टाकायला लावले यासाठी एकूण दोन लाख २९हजार रुपये फिर्यादीकडून आरोपीनी घेतले मात्र त्याला कोणतीही नोकरी लावली नाही व त्याची फसवणूक केली याबाबत मोहित याने शहर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com