परिचारिकांचे प्रश्न शासकीय पातळीवर नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार-माजी महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर
परिचारिकेचा वेल्फेअर मंच आयोजित “आशा ..एक मनोरंजनात्मक मोटिवेशन कार्यक्रम” सादर करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला 12 मे 2021 रोजी परिचारिका वेलफेअर मंचाची स्थापना करण्यात आली. परिचारिकांसाठी सर्व स्तरावर काम करण्यासाठी या मंचाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये स्वतः परिचारिका आणि परिचारिकांच्या कार्याला समजून घेणारे सर्व समाजसेवी लोक एकत्र येऊन या मंचाचे काम सुरू आहे. मंचामध्ये सहभागी झालेले सुप्रसिद्ध कलाकार आणि रेडिओ जॉकी श्री संदीप लोखंडे’ मुबई यांनी असे मत व्यक्त केले की, परिचारिकांना ह्या कोरोनाकाळामध्ये सतत तणावाखाली काम करावे लागेल आहे यासाठी त्यांना मनोरंजन आणि मोटिव्हेशनसाठी आशा.. एक मनोरंजनात्मक मोटीवेशनल कार्यक्रम स्वतः सादर करण्याचे करण्याची जबाबदारी घेतली. मुंबईच्या बॉम्बे पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलच्या ज्येष्ठ परिचारिका श्रीमती पूर्वा आंबेकर यांनी माझी महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर यांची ओळख सांगताना असे आवर्जून सांगितले की, त्यांच्या महापौर काळामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दौरे केल्यानंतर त्यांनी महिलांसाठी अनेक वेल्फेअरचे कार्यक्रम राबवले त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. श्रीमती स्नेहल आंबेकर यांनी आपल्या भाषणात परिचारिकांच्या कार्याबद्दल अतिशय सह्रदय गौरव उद्गार काढले तसेच परिचारिकांचे प्रश्न शासकीय पातळीवर नेण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले.
मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू असताना मध्यंतराच्या भाग म्हणून विशेष चर्चेचा कार्यक्रम ठेवला गेला होता यावेळी गडहीग्लज, कोल्हापूर येथील माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. प्रभाकर द्राक्षे यांनी या मंचामध्ये आपण काम करणार आहोत आणि गडहिग्लज येथील परिचारिका संघटनसाठी प्रयत्न करणार आहोत.डॉ. द्राक्षे हे डॉ. आनंद आंबेकर यांचे गुरु असल्याने डॉ. आनंद आंबेकर यांच्या वाटचालीबद्दल माहिती दिली आणि एमफिल अभ्यासक्रमासाठी परिचारिका अभ्यास मी स्वतः त्यांना करण्यासाठी प्रवृत्त केले होते याची आठवण करून दिली.
चर्चमध्ये श्री विलास साडवीलकर हे मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करणारे परंतु ” रुग्ण मित्र” खूप मोठी चळवळ चालवतात या चळवळींमध्ये रत्नागिरी येथे डॉ. आनंद आंबेकर यांनी सहकार्य करावे असे आवर्जून सांगितले.
परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा स्नेहा बने यांनी सदर मंचाची स्थापना केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला महाराष्ट्रातून जवळ जवळ 48 परिचारिका ऑनलाईन उपस्थित होत्या दर महिन्याला परिचारिका वेल्फेअर मंचाचे कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com