चक्रीवादळ काळात नागरिकांनी घ्यायची खबरदारी

रत्नागिरी तालुक्यातील सागरी किना-यावरील व आसपासच्या सर्व गावांमधील नागरीकांनी दि. 14 मे ते 18 मे या कालावधीत सतर्क राहायचे आहे.

किनारपटटीच्या आसपासच्या गावातील सर्व नागरीकांनी आपल्या घरातील विज जाण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तात्काळ आपल्या घरात आवश्यक इतके मेणबत्ती/आगकाडी बॉक्स/केरोसीन/टॉर्च/बॅटरी/शुष्कघट इ साहित्य तयार करुन ठेवावेत

चक्रीवादळामुळे झाडे उन्मळुन व तुटुन पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व नागरीकांनी आपल्या घराच्या आसपास व घराला संभाव्य धोका असणारी झाडे तात्काळ तोडुन घ्यावीत.

सर्व नागरीकांनी आवश्यक रेशनची आपल्या कुटुंबासाठी व्यवस्था करुन ठेवावी. संकटकालीन वापराकरिता कोरडे व खराब न होणारे खादयपदार्थ खबरदारीचे उपाय म्हनुन तयार ठेवावेत. लहान मुले, वृध व्यक्तींसाठी लागणारा विशेष आहार सोबत ठेवावा.

ग्राम कृती दल व ग्रामपंचायती यांनी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक शासकीय कर्मचारी यांच्या मदतीने चक्रीवादळ व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी याबाबत दवंडी, रिक्षा फिरवुन, सोशल मिडीयाचा वापर करुन प्रचार प्रसिध्दी करावी.

प्रत्येक गावस्तरावर जे.सी.बी, वुड कटर पोहणारे व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी, स्वयंसेवक इ ची मोबाईल नंबरसह यादी तलाठी व ग्रामपंचायत यांचेकडे तयार करण्यात यावी व त्यांचे संपर्कात राहावे.

प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर पुरेशा पिण्याची पाण्याची सोय, पाणी शुध्दीकरणासाठी पुरेशा प्रमाणात निर्जंतूकीकरण पावडर, उपलब्ध करुन घ्यावे. नागरीकांनी जादा पिण्याचे पाणी घरात सुरक्षीत जागी साठवुन ठेवावे.

सदर चक्रीवादळाच्या कालवधीत कोणीही मच्छीमार बांधव मासेमारीसाठी, पोहण्यासाठी समुद्रात जाणार नाहीत याची दक्षता ग्राम कृती दल व ग्रामपंचायतीने घ्यावी.

अफवांवर विश्वास ठेऊ नये, अफवा पसरवु नये. कोणत्याही परिस्थितीत घबराटाची स्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. शंका आसल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष (02352-226248) किंवा
रत्नागिरी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षात ( 02352-223127) फोन करावे.

आपले क्षेत्र चक्रीवादळाच्या धोक्यात सापडते, तेव्हा तात्काळ खाडी, सागरी किनारा व इतर पाणथळ जागा यापासून सुरक्षीत ठिकाणी जावे.

खिडक्या/दरवाजे काचा बंद कराव्यात किंवा वा-यापासुन संरक्षण देणा-या झडपा घालावेत. बाहेरील दरवाज्याना मजबुत टेकु देण्यात यावा.

चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने जर स्थलांतराचे आदेश दिलेस तात्काळ आदेशाचे पालन करावे व सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर व्हावे व प्रशासनास सहकार्य करावे.

चक्रीवादळातील आपदग्रस्ताना तात्काळ मदत व उपचारासाठी प्राथमीक आरोग्य केंद्रात किंवा हॉस्पीटललाआणण्यासाठी गावस्तरावर ग्रामपंचायत व ग्राम कृती दलानी ॲम्बुलन्सची व्यवस्था करुन ठेवावी.

शशिकांत जाधव
तहसीलदार
रत्नागिरी

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button