
गरुड झेपMKCL रत्नागिरी आयोजित शालेय स्पर्धा परीक्षा गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रम
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एम.के.सी.एल. ही शासनाची अधिकृत संस्था आहे. एम.के.सी.एल. ही संस्था 2001 साली महाराष्ट्र शासन व महाराष्ट्रातील १० विभागीय विद्यापीठे आणि अनेक शास्त्रज्ञ यांच्या सहयोगातून स्थापन झाली .माहिती तंत्रज्ञानाच्या समूचीत उपयोजनाद्वारे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एम.के.सी.एल. गेली 23 वर्ष कार्यरत आहे. अध्ययन, अध्यापन व शैक्षणिक व्यवस्थापन क्षेत्रात 21 व्या शतकाशी समर्पक अशा परिवर्तनासाठी एम.के.सी.एल. ने खूपच मोठी भरीव कामगिरी केली आहे .आज पर्यंत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील दोन कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना एम. एस. सी. आय. टी कोर्सच्या माध्यमातून कॉम्प्युटरचे स्मार्ट युजर बनवून महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे संगणक साक्षर राज्य बनवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी एम.के.सी.एल. ने पार पाडली आहे. महाराष्ट्र प्रमाणेच बिहार, हरियाणा, ओरिसा राज्यात तर सौदी अरेबिया, इजिप्त आदी देशात एमकेसीएलचे शैक्षणिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. एम.के.सी.एल.चे विविध ऑनलाइन अभ्यासक्रम अमेरिका, कॅनडा आदी देशातील विद्यार्थी शिकत आहेत. शासनाने शालेय अभ्यासक्रमात काही वर्षांपूर्वी आयसीटी हा विषय इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी साठी ऐच्छिक तर नववी आणि दहावीसाठी अनिर्वाय म्हणून समाविष्ट केला होता. मात्र 2017 पासून स्वतंत्र विषय अशा स्वरूपात अभ्यासक्रमात तो समाविष्ट नाही. परंतु जगभर आयसीटी ची व्याप्ती मात्र काळासोबत प्रचंड वेगाने वाढत आहे .आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनातून हे सातत्याने निष्पन्न होत आहे की पुढील दशक हे डिजिटल महा परिवर्तनाचे दशक असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, न्यानो टेक्नॉलॉजी, आणि थ्रीडी प्रिंटिंग या गोष्टी आपले दैनंदिन जीवन अमुलाग्र बदलून टाकणार आहे. या क्रांतीमुळे आपल्या विद्यार्थ्यांना येत्या दशकात अगदी नवीनतम अशा करिअरच्या असंख्य संधी प्राप्त होणार आहेत. आपली पिढी या रोमहर्षक कालखंडात जागतिक पातळीवर नेतृत्व देण्यास सक्षम होण्यासाठी वरील महत्त्वपूर्ण व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दिनांक 9 सप्टेंबर रोजी रॉयल बँक्वेट हॉल, सीएनजी पंप नजिक ,जे के फाइल्स जवळ या ठिकाणी रोटरी क्लब, युवासेना, जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ आणि सर्व MKCL अधिकृतMS-CIT सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने एम.के.सी.एल. विद्यार्थ्यांसाठी" गरुड झेप "हा कार्यक्रम आयोजित करीत आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालक मंत्री श्रीमान उदयजी सामंत उपस्थित राहून पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच एन. एम. एम. एस. परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलांचा सत्कार करतील आणि उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्यात उज्वल कामगिरीसाठी मार्गदर्शन करतील. या विद्यार्थ्यांना तज्ञ आणि निष्णात मार्गदर्शकांकडून सुयोग्य मार्गदर्शन होणार आहे. एकंदरीत रत्नागिरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एम.के.सी.एल. अशा पद्धतीने प्रयत्नशील असणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ९.३०ला सुरू होऊन सायंकाळी ४.३० पर्यंत असणार आहे .गावातील आणि शहरातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमला येण्यासाठी एम.के.सी.एल.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बसची सुविधा त्याचप्रमाणे आलेल्या विद्यार्थ्यांना नाश्ता व जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील आपल्या पाल्याच्या कल्याणासाठी उपस्थित राहून फायदा करून घ्यावा असे आवाहन MKCL रत्नागिरी जिल्हा समन्वयक संतोष कोलते यांनी केले आहे.
www.konkantoday.com