काेराेनाची जागतिक साथ म्हणजे अँमेझॉनसाठी ‘सोनेरी दिवस’ ठरतेय
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे लोक जगभरात घरात अडकून पडले आहेत. अनेक देशांमध्ये परिस्थिती पुन्हा चिघळली आहे. अशात जगभरातले लोक अजूनही घरात बसून काम करत आहेत आणि गरजेच्या वस्तू ऑनलाईन मागवत आहेत.
यामुळेच नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत ऑनलाईन रिटेलर कंपनी अँमेझॉनचा नफा तिपटीने वाढला आहे.
या कंपनीच्या सगळ्या विभागांना, मग ते ऑनलाईन व्हीडिओ स्ट्रीमिंग असो किंवा किराणा माल विकणं, फायदा झालेला आहे.
येत्या काही महिन्यात हा फायदा असाच होत राहील अशा अपेक्षा आहेत.ही जागतिक साथ म्हणजे अँमेझॉनसाठी ‘सोनेरी दिवस’ ठरलेय असंही एका तज्ज्ञाने म्हटलं.
www.konkantoday.com