मुंबई महापालिकेच्या बिझनेस डेव्हलपमेंट सेलला अजय देवगणच्या एनव्हाय फाऊण्डेशनकडून एक कोटी रुपये
मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या लक्षात घेत मुंबई माहनगरपालिकेने शिवाजी पार्क येथील भारत स्काऊट आणि गाईड हॉलचे २० बेड्सच्या आयसीयु रुग्णालयात रुपांतर केलं आहे. या रुग्णालयामधील पॅरामॉनिटर्स, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन सपोर्ट सिस्टीमसाठी अभिनेता अजय देवगणने मदत केली आहे. अजयने त्याच्या मित्रांसोबत मिळून एक कोटी रुपयांचा निधी या कामासाठी मुंबई महानगरपालिकेला दिलाय.
महापालिकेच्या बिझनेस डेव्हलपमेंट सेलकडे अजयच्या एनव्हाय फाऊण्डेशनकडून एक कोटी रुपये देण्यात आलेत.
www.konkantoday.com