
राज्य सरकारने कोरोना रुग्णांवर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करण्यास मान्यता दिली
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारकडून विविध टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. या टास्क फोर्समधील विविध शाखेतील तज्ज्ञांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवरील उपचारांविषयी निर्णय घेण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील आयुष टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून आता राज्य सरकारने कोरोना रुग्णांवर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करण्यास मान्यता दिली आहे. तसेच, राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंबंधी प्रमुख मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रकही जाहीर केले.
www.konkantoday.com