भाजप नेते व माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवभोजन थाळीमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला
मागच्या वर्षी शिवभोजन थाळीच्या नावाने रत्नागिरी जिल्ह्याला १ कोटी ३२ लाख रुपये मिळाले. ही रक्कम जिल्ह्यातील शिवसेनेच्या आणि चिपळूण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्याची यादी आपल्याकडे आहे. शिवभोजन थाळीची जिल्ह्यात २२ केंद्रे आहेत. त्यापैकी ८ केंद्रे रत्नागिरी शहरात आहेत. रत्नागिरीतील केंद्रांवर दररोज ११०० ते १२०० लोक जेवतात का, असा प्रश्न उपस्थित करून भाजप नेते व माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवभोजन थाळीमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे शहराध्यक्ष तसेच विभागप्रमुख व पदाधिकारी शिवभोजन थाळ्या चालवीत आहेत.
www.konkantoday.com