एप्रिल महिना संपत आला तरी बाजारात हापूस आंब्याची उपलब्धता अत्यल्पच
लहरी हवामान आणि अवकाळी पावसामुळे गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादनात घट होत आहे. यावर्षीही तशीच स्थिती असून जेमतेम दहा ते पंधरा टक्के उत्पादन आले आहे. कमी उत्पादनामुळे यावर्षी एप्रिल महिना संपत आला तरी बाजारात हापूस आंब्याची उपलब्धता अत्यल्पच आहे. चांगल्या आंब्याला ग्राहकांची मागणी आहे, परंतु आंबाच नसल्याने उत्पादक आणि विक्रेत्यांचेही अर्थकारणच कोलमडले आहे.
www.konkantoday.com