
एमआयडीसीने केली उद्योजकांच्या सेवा शुल्कात वाढ, उद्योजकांच्यात नाराजी
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेतील उद्योगाच्या भूखंड धारकांकडून घेण्यात येत असलेल्या सेवाशुल्काचे दर वाढवण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ उद्योग विकासासाठी स्थापन करण्यात आले. त्यांच्यामार्फ रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि सांडपाणी व्यवस्था आदी सेवा उद्योजकांना पुरविण्यात येतात. या बदल्यात उद्योजकांकडून सेवा शुल्क आकारले जात असते. एमआयडीसीने या सेवा शुल्कामध्ये वाढ करून पंधरा रुपये, दहा रुपये, पाच रुपये प्रति चौरस मीटर या दराने सेवाशुल्क घेण्याचे निश्चित केले आहे. कोकणातील औद्योगिक वसाहतीचा विचार केला तर महाड, लोटे परशुराम, रत्नागिरी, कुडाळ, रोहा या औद्योगिक क्षेत्राचा सेवाकर ३ रुपयांवरून १५ रुपये करण्यात आला आहे.
www.konkantoday.com