एर्नाकुलम एक्स्प्रेसमधून फूस लावून पळवून नेणार्या अल्पवयीन मुलीला रत्नागिरीत रेल्वे सुरक्षा बल व ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले
केरळ येथील कन्नूर मधून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून आेखा एर्नाकुलम या एक्स्प्रेस या रेल्वेमधून पळवून नेत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही गाडी रत्नागिरी स्थानकात आली असता रेल्वे सुरक्षा बल व ग्रामीण पोलिसांनी तपास करून सदर वर्णनाच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहेत मात्र त्यांचे साथीदार सापडू शकले नाहीत सदरची अल्पवयीन मुलगी व अन्य दोन मुली काहीजणांबरोबर या गाडीतून जात असल्याची खबर गोवा व बेलापूर येथून रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती त्याप्रमाणे ही गाडी रत्नागिरी स्थानकात पोलिसाने गाडीची तपासणी सुरू केली मात्र त्यांना ही मुलगी सापडू शकले नव्हते त्यानंतर तपासणी करीत असताना डी वन या डब्यातील काही महिलांनी ही मुलगी पाहिल्याचे सांगितले त्याप्रमाणे पोलिसांनी तपासणी केली असता या डब्यातील शौचालय बंद असल्याचे आढळले पोलिसांनी ते उघडले असता त्यामध्ये ही मुलगी सापडली सुरुवातीला ती समाधानकारक उत्तरं देत नव्हते त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता आपला मित्र राजू याच्याबरोबर आपण लग्न करण्यासाठी त्याच्याबरोबर आपण राजस्थानला जात होतो असे तिने सांगितले मात्र सर्व गाडीची तपासणी करुनही तिचा साथीदार सापडू शकला नाही याबाबत सदर मुलीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे
www.konksntoday.com