
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध भाज्यांच्या दरात प्रचंड वाढ.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध भाज्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे अनेक भाज्यांचे भाव गगनाला भिडले असून सोबत कांदा, बटाटा, आलेसह लसूणही महागली आहे. गणेशोत्सव सुरू झाल्याने भाज्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे या वाढलेल्या मागणीमुळे भाजीपाला महागला आहे. कांदा, बटाटा, आले, लसूण आणि कोथिंबीर यांचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. 20 ते 30 रुपयाला मिळणारी कोथिंबीर जुडी 100 रुपयाच्या घरात पोहोचली आहे लसूण पूर्वी 100 ते 150 रुपये किलो दराने मिळत असताना आता 300 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नेहमीच्या स्वयंपाकात आवश्यक असणार्या कांद्याचे दर देखील वाढले असून 50 ते 70 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत, तर बटाट्याचा दरही वाढलेला दिसतो. आजपासून गणपती उत्सवाला प्रारंभ झाल आहे. श्रावण महिन्यामुळे अनेक गणेश भक्त शाकाहारी आहाराचे पालन करत आहेत. यामुळे शाकाहारी भाज्यांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने बाजारातील दर वधारले आहेत