
कोल्हापूर जिल्ह्यात यायचे असेल तर कोव्हिड चाचणी बंधनकारक
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात यायचे असेल तर कोव्हिड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोविड चाचणी केली नसेल तर ७ दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा आदेश दिला आहे.
कोल्हापुरात बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची लस घेतली असेल तर चाचणी बंधनकारक नसणार आहे.
www.konkantoday.com