कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रत्नागिरी शहरात ३२५ अतिरिक्त बेड उपलब्ध करण्यात येणार – नामदार उदय सामंत
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रत्नागिरी शहरात ३२५ अतिरिक्त बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत, तर ‘मिनी लॉकडाऊन’ची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मंगळवारी आढावा बैठक झाल्यानंतर सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. दुसर्या लाटेशी लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन सज्ज आहे. प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी यासाठी महिला रुग्णालयात १२५अतिरिक्त बेड तयार करण्यात येणार आहेत तर रत्नागिरी न.प. रुग्णालयात ५० बेड, समाजकल्याण भवन ५० बेड, बी. एड. महाविद्यालयात १०० बेड असे ३२५अतिरिक्त बेड तयार करण्याची सूचना ना. सामंत यांनी आरोग्य विभागाला केली आहे.
www.konkantoday.com