
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी उदय बने यांची निवड
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या तडजाेडीनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय बने यांना उपाध्यक्षपद देण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. काल झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी यांनी उदय बने यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. मात्र, उदय बने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांच्या अनुपस्थितीतच ही निवडणूक पार पडली.
www.konkantoday.com