
येत्या ४८ तासात मान्सून केरळमध्ये, राज्यात पुढील आठवड्यात
मुंबई ः वाढते तापमान आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी खूषखबर आहे. ती म्हणजे येत्या ४८ तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर पुढच्या आठवडाभरात तो राज्यात दाखल होणार आहे. त्यानंतर पुढच्या आठवडाभरात तो राज्यात दाखल होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.
राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असल्याने बळीराासह सर्वचजण पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र यंदाचा मान्सून हा कमजोर राहिल, असे भाकीत हवामान तज्ञांनी वर्तविले आहे.