राज्यात मुद्रांक शुल्कातील सवलतीला मुदतवाढ नाही, आज पासुन घर खरेदीसाठी ५% मुद्रांक शुल्क भरावे लागणार
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती देत यापुढे राज्यात मुद्रांक शुल्कातील सवलतीला मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं. सवलतीला मुदत वाढ देण्याची भूमिका महसूल विभागाची होती, पण अर्थ खात्याचा मुदतवाढ देण्यास विरोध होता. त्यामुळे सवलतीला मुदतवाढ नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
सदर निर्णयामुळं १ एप्रिल २०२१ पासून उद्यापासून घर खरेदीसाठी ५% मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. कोरोनामुळे ठप्प असलेल्या बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये दोन टक्के सवलत दिली होती.
www.konkantoday.com