
खंडाळा निवळी रोडवर ट्रकखाली झोपलेल्या क्लीनरच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू
ब्रेक डाऊन झाल्याने ट्रकखाली झोपलेला क्लीनर ट्रकचालकाच्या लक्षात न आल्याने ट्रकचालकाने ट्रक चालू केल्याने ट्रकखाली सापडून मेहबूब हाजी मलंग राहणार कर्नाटक याचा मृत्यू झाला
हनुमंत माने हा ट्रकचालक आपला ट्रक घेऊन जयगड जिंदाल कंपनीकडे जात होता मात्र वाटेत अगरनळ फाट्यावर आला असता ट्रक ब्रेक डाऊन झाला त्यामुळे ट्रकच्या दुरूस्तीचे काम सुरू होते दरम्यान ट्रकमध्ये असलेला क्लिनर मेहबूब मलंग याला झोप आल्याने तो चालकाला सांगून ट्रकखाली झोपायला गेला दरम्यान चालक माने याने दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यावर ट्रक चालू केला मात्र ट्रकखाली झोपलेला क्लिनर त्यांच्या लक्षात आला नाही यामुळे ट्रक खाली झोपलेल्या मेहबूब यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने तो जागीच ठार झाला याबाबत चालक हनुमंत माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com