
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये रत्नागिरी दक्षिण झोन मध्ये गोगटे कॉलेज चॅम्पियन
५३ वा मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव 2021 मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने झोनल राऊंडमध्ये
१० स्पर्धांपैकी ८ स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त करत चॅम्पियन ठरले आहे.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झालेली पारितोषिके
प्रथम क्रमांक
शास्त्रीय गीतगायन स्पर्धा – वैष्णवी जोशी
सुगम संगीत- वैष्णवी जोशी
वेस्टर्न गीतगायन स्पर्धा- सम्यक हातखंबकर
मिमिक्री- शैलेश इंगळे
एकपात्री- शुभम गोविलकर
द्वितीय क्रमांक
वक्तृत्व स्पर्धा- सीमा दसाणा
तृतीय क्रमांक
ऑन स्पॉट पैंटिंग- ओमकार कांबळे
कथाकथन- पर्णिका तिवरेकर
सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांच्या सोबत प्रा.शुभम पांचाळ, प्रा.मधुरा आठवले- दाते,प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा.आरती पोटफोडे, प्रा.अजिंक्य पिलणकर तसेच विद्यार्थी सचिव बुशरा खान, व सांस्कृतिक विभाग विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद साळवी शुभम शिवलकर, पर्णीका सुर्वे,कौस्तुभ आंब्रे, स्वप्नील शिंदे,सिद्धी गुरव,यांनी व्यवस्थापन केले तसेच सिद्धी शिंदे,शुभम नंदानी,चैतन्य पटवर्धन, केदार लिंगायत स्वानंद नेने, विशेष मेहनत घेतली
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन , कार्यवाह श्री सतीश शेवडे , प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
झोनल चॅम्पियनशिप मध्ये इतर महाविद्यालयाचे पॉईंटस खालील प्रमाणे आहेत
गोगटे जोगळेकर कॉलेज- १८
आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज- ११
आर्टस् कॉमर्स अँड ससान्स कॉलेज लांजा- ८
दि कॅड कॉलेज- ५
नवनिर्माण कॉलेज – ४
चाफे कॉलेज- ३
भारत शिक्षण मंडळ कोलेज- ३
फिनोलेक्स कॉलेज- १
आबासाहेब मराठे कॉलेज- १
स्पर्धांच्या कालखंडात सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थी, प्राध्यापक, व प्राचार्य यांनी उत्तम सहकार्य केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक डॉ.आनंद आंबेकर धन्यवाद मानले आहेत.तसेच सह समन्वयक प्रा.राहुल कोतवडेकर यांचे सहकार्य होते आणि मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील पाटील आणि सांस्कृतिक समन्वयक श्री निलेश सावे यांचे मार्गदर्शन होते.