
चिपळूण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चिपळूण विभागाच्या अख्यत्यारीतील ठेकेदारांची बिले थकली
चिपळूण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चिपळूण विभागाच्या अख्यत्यारीतील ठेकेदारांची ५० कोटी रुपयांची बिले थकीत असल्याने ठेकेदारांसह सुशिक्षित बेरोजगार अभियंते अडचणीत आले आहेत. या बिलांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप ठेकेदारांना बिले मिळालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी ठेकेदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंते कार्यालयात धडकले आणि त्यांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन जाब विचारला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यतारीत रस्ते, पूल, साकव यासारखी कामे केली जातात. याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध केला जातो. मात्र, काही वेळा वेळेत निधी उपलब्ध न झाल्यास ठेकेदार अडचणीत येत आहेत
www.konkantoday.com