
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधील मुदत संपलेले ११ गाळे नगरपरिषद प्रशासनाच्या ताब्यात
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधील मुदत संपलेले ११ गाळे काल अखेरीस नगर परिषद प्रशासनाच्या ताब्यात आले.
ही कारवाई ३मार्च रोजी होणे अपेक्षित होती परंतु कागदोपत्री अडचणी व पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ती कारवाई बारगळली होती. गाळ्यांची लिलाव प्रक्रिया यापूर्वीच झाली होती. मात्र जुन्या गाळे धारकांकडून ताब्यात आले नव्हते. नव्या मूल्यांकनानुसार या गाळ्यांसाठी ७ लाख ८१ हजार रुपये अनामत तर २४ हजार ३००रुपये मासिक भाडे ठेवण्यात आले आहे.
शिवाजी स्टेडियममधील ११ व्यापारी गाळे ताब्यात घेण्यासाठी नगर परिषदेच्या सभेत झालेल्या निर्णयानुसार प्रशासनाकडून कारवाईसाठी पावले उचलण्यात आली.
www.konkantoday.com