
रत्नागिरी बार असोशिएशनच्या अध्यक्षपदीं ॲड विलास पाटणे
- संघटनेचे एक प्रभावी व्यासपीठ उभे करूया *
ॲड विलास पाटणे
रत्नागिरी बार असोशिएशनच्या निवडणुकीत तब्बल शंभर मताधिक्य घेवून अध्यक्षपदीं ॲड विलास पाटणे विजयी झाले .
यापूर्वी संघटनेचा ॲड पाटणे यांनी सचिव म्हणून काम केले आहे . आम श्री संजयजी केळकर यांनी आमदार निधीतून दिलेल्या आठ लाख रकमेतून न्या.खारेघाट हॉल पूर्ण करणेसाठीत्यांनी विशेष प्रयत्न केले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रतर्फे आयोजित कोकणातील वकील परिषदेच्या स्वागताध्यक्ष म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली .रविंद्नाथ टागोर यांच्या म्युरल शिल्पाच्या उभारणीसाठी पाठपुरावा. केला ” रामशास्त्री” पुस्तक सर्वोच्च न्यायालयाचे न्या अभयंजी ओक यांचे उपस्थितीत महाराष्ट्रतील सर्व बार संघटनांना वितरित करण्याचा बहुमान त्यांना मिळाला .
संघटनेसाठी एक मोठा हॉल उपलब्ध करून विविध न्यायालये रत्नागिरीत सुरू होतील यासाठी विशेष प्रयत्न करुया . संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न विशेष करून ज्युनिअर वकिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन . आपण सर्वांनी मिळून संघटनेचे एक प्रभावी व्यासपीठ निर्माण करूया. ,असे याप्रसंगी ॲड विलास पाटणे म्हणाले .
www.konkantoday.com