
प्रवासी उभे आणि टायर सीटवर,रत्नागिरी-देवरूख गाडीतील प्रकार
सध्याच्या परिस्थितीत रत्नागिरी-देवरूख मार्गावरील फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. भारमान असूनही एस. टी. फेऱ्या नाहीत, अशी स्थिती या मार्गावर आहे. अनेक वेळा रत्नागिरीतील लोकल प्रवाशांमुळे देवरूखच्या प्रवाशांना गाडीत प्रवेश मिळत नाही. गुरुवारी तर निम्म्या एसटीच्या गाडीत टायर भरून नेण्याचा प्रकार घडला. यामुळे अनेक प्रवाशांना गाडीबाहेरच थांबावे लागले. प्रवासी उभे आणि टायर सीटवर, अशी स्थिती या फेरीत होती.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजता सुटलेल्या रत्नागिरी-देवरूख फेरीमध्ये हा प्रकार घडला.
wwww.konkantoday.com