रिपाइं चे आत्मदहन आंदोलन तुर्तास स्थगित -सुशांत भाई सकपाळ
खेड तालुक्यातील भरणे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे गाव भडगाव भरणे बाईत वाडी ते बौद्धवाडी येथे शासनाच्या विशेष घटक योजनेच्या मागास वर्गीय निधीचा गैर वापर करणाऱ्याची सखोल चौकोशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करणेबाबत नावीलाजस्तोव आत्मदहन करण्याचे आंदोलन छेडले होते परंतु मा सोनाने साहेब उपविभागीय अधिकारी उपविभाग खेड यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यलय खेड येथे आयोजित बैठकीला मा चिकने साहेब समाज कल्याण उप आयुक्त रत्नागिरी तसेच मा मुळे साहेब कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम चिपळूण व मा जटाळ मॅडम उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम खेड तसेच मा टकले साहेब नायक तहसीलदार खेड यांच्या समवेत झालेल्या चर्च प्रमाणे व बैठकीत अध्यक्षाने दिलेल्या निर्णय प्रमाणे सदर प्रकरणी मा जिल्हाधिकारी साहेब रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरीत चौकशी समिती स्थापन करून त्या चौकोशी समितीच्या अहवाला प्रमाने जे दोषी आढळतील व ज्यांनी आपल्या कर्तव्यत कसूर केली आहे अशा दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा अध्यक्ष ने दिलेल्या निर्णयाचा आदर ठेवून आजपासून आयोजित केलेले आत्मदहनाचे आंदोलन तुर्तास
स्थगित करण्यात आले आहे मात्र वरील निर्णया प्रमाणे लवकरात लवकर निर्णय मिळाला नाही तर सदरचे आंदोलन या पुढे चालू राहील व त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामास संबंधित अधिकारी जबाबदारी राहतील असे रिपाइं चे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांनी पत्रकार यांच्याकडे बोलताना सांगितलेत तसेच उपस्थित खेड तालुका अध्यक्ष रजनीकांत जाधव युवक अध्यक्ष विकास धुत्रे महिला आघाडी अध्यक्ष रेश्मा तांबे मिलिंद तांबे आर पी येलवे युवा नेते गणेश शिर्के जितेंद्र तांबे सखाराम सकपाळ अन्य पदाधिकारी उपस्थित होते
www.konkantoday.com