
गोवा सरकारने राज्यात लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली
महाराष्ट्रासोबतच इतरही अनेक राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. महाराष्ट्राचं शेजारी राज्य असलेलं आणि पर्यटकांचं आकर्षण असलेल्या गोव्यामध्ये देखील रुग्ण वाढू लागल्यामुळे अखेर गोवा सरकारने राज्यात लॉकडाउन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. येत्या २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून ३ मे रोजी सकाळपर्यंत हा लॉकडाउन लागू असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गोव्यातील कसिनो, हॉटेल, पब हे देखील लॉकडाउन दरम्यान बंदच ठेवण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com