पुण्यात आता कराेना प्रतिबंधक लसीचा नवा घोटाळा उघडकीस
पुण्यात आता नवा घोटाळा उघडकीस आला आहे. लसीकरण केंद्रांना करण्यात आलेला लस पुरवठा आणि प्रत्यक्षात झालेलं लसीकरण यांचा हिशेबच जुळत नाही. या हलगर्जीपणाला जबाबदार कोण असा प्रश्न पडू लागलाय.
तब्बल ४४ हजार ९४४ लसी गेल्या कुठं, असा प्रश्न सध्या पुणे जिल्हा प्रशासनाला पडला आहे. गेल्या १६ जानेवारीपासून पुण्यात लसीकरणाला श्रीगणेशा झाला. त्यासाठी १ लाख ८ हजार ५५६ लसींचा पुरवठा जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांना करण्यात आला होता.
www.konkantoday.com