रेन हार्वेस्टींगसह सांडपाणी रिसायकलींग असे प्रकल्प प्राधान्याने पालिकेने राबवावेत
रत्नागिरी शहरातील लोकसंख्या वाढत असून त्यादृष्टीने पाण्याचे सुयोग्य नियोजन करावे लागणार आहे. पाणी चोरीचा गंभीर प्रकार न थांबविल्यास भविष्यात शहरवासियांना कायमस्वरूपी टंचाईचा सामना करावा लागेल, असा निष्कर्ष सर्वेक्षणाद्वारे काढण्यात आला आहे.
ग्राहक पंचायत, भारत शिक्षण मंडळ संचलित डीजीके महाविद्यालय यांच्या सर्वेक्षणातून गंभीर स्वरूपात निर्माण होणार्या पाणीटंचाईचा निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती प्राचार्य उदय बोडस, ऍड. दिलीप भावे यांनी दिली. बोअरवेलसह नवीन इमारतींच्या उभारणीला परवानगी देणे आवश्यक आहे. बोअरवेल असल्यास इमारती उभारण्याला पालिकेने परवानगी नाकारली पाहिजे. रेन हार्वेस्टींगसह सांडपाणी रिसायकलींग असे प्रकल्प प्राधान्याने पालिकेने राबवावेत अशी सूचनाही करणेत आली आहे.
www.konkantoday.com