नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प परिसरात झालेल्या जमीन व्यवहारांची चौकशी हाेणार
विविध कारणांमुळे सतत चर्चेत राहिलेल्या राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प परिसरात झालेल्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे यासाठी संबंधित गावातील तलाठी कार्यालय तसेच राजापूर प्रांत कार्यालयात तक्रार स्वीकृती कक्ष स्थापन करण्यात आला असून ३१ मार्चपर्यंत भूमीपुत्रांकडून तक्रारी अथवा निवेदने स्वीकारली जाणार आहेत.
www.konkantoday.com