जयगड-डिंगणी रेल्वे मार्गाचे काम कंपनीने थांबविले
जयगड-डिंगणी रेल्वे मार्गाचे काम सध्या बंद करण्यात आले आहे. कोरोनाचा परिणाम व्यवसायावर झाल्याने संबंधित कंपनीने काम थांबविले आहे. कोकणासह राज्यातील बंदरे रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी सागरमाला या केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत या मार्गाचे काम सुरू होते. खाजगी तत्वावर हे काम सुरु असल्याने या मार्गाचे भवितव्य पूर्णतः संबंधिक कंपनीवर अवलंबून असल्याचे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले.
www.konkantoday.com