जमीन देण्यास संमती असलेल्या गावांमध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करावी -जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर
रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला ज्या गावांमधील लोकांचा विरोध आहे ती गावे वगळून जमीन देण्यास संमती असलेल्या गावांमध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करावी अशी आमची पूवीर्पासून मागणी आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सकारात्मक वक्तव्याचे आम्ही स्वागतच करतो. विरोध असलेली गावे वगळून आणि संमती असलेल्या गावांमध्ये शासनाने रिफायनरी प्रकल्प उभारावा अशी मागणी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी केली आहे.
ज्या गावांचा प्रकल्पाला विरोध नाही तर संमती आहे अशा गावांमध्ये तारळ, विल्ये, उपळे गोठीवरे, सागवे, कात्रादेवी या गावांचा समावेश आहे.
www.konkantoday.com