
आकडा फिक्स होताच शिवसेना नाणारला पाठिंबा देईल-भाजप आमदार नितेश राणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नाणारला पाठिंबा दिला आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणीही केली आहे.त्यांच्या या पत्राचा आधार घेत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेनेवर हल्लाबोल केला आहे.शिवसेनेची कंपनीसोबत डिलिंग सुरू आहे.आकडा फिक्स होताच शिवसेना नाणारला पाठिंबा देईल, असा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे.
www.konkantoday.com