
राज्यातील इनलँड वेसल्सवर तैनात होणाऱ्या सुमारे ७ हजार तरुणांना नौकानयन विषयक कौशल्य व प्रशिक्षण मिळणार
राज्यातील नौकानयन क्षेत्रातील मनुष्यबळास योग्य प्रशिक्षण, कौशल्य वृद्धीसंदर्भात सहाय्य करण्यासाठी बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) आणि चेन्नईमधील भारतीय सागरी (मेरिटाइम) विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करण्यात आला. महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी आणि भारतीय सागरी विद्यापीठाच्या संचालक कमोडोअर राजीव बन्सल यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या करारामुळे राज्यातील इनलँड वेसल्सवर तैनात होणाऱ्या सुमारे ७ हजार तरुणांना नौकानयन विषयक कौशल्य व प्रशिक्षण मिळणार आहे.
www.konkantoday.com