
राज्यात ट्रॅव्हलर ऍम्बुलन्स विक्री करण्याचा पहिला मान गांधी फोर्सला
रत्नागिरी ः फोर्स कंपनीने अद्ययावत अशा तयार केलेल्या ट्रॅव्हलर ऍम्बुलन्सची विक्री करण्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून पहिला मान रत्नागिरीच्या गांधी फोर्सने मिळविला असून ही गाडी खरेदी करण्याचा पहिला बहुमान रत्नागिरीच्या क्रिटीकल केअरचे मालक हेमंत जोशी आणि त्याच्या सहकार्यांनी मिळविला आहे. गांधी फोर्सचे मालक यश जयप्रकाश गांधी, फोर्स मोटर्सचे सर्व्हिस मॅनेजर मित्तल, क्षेत्रीय सर्व्हिस मॅनेजर कोटकर यांच्या हस्ते या ऍम्बुलन्सच्या चाव्या श्री. जोशी यांनी सुपूर्द करण्यात आल्या.
फोर्स मोटर्सची ट्रॅव्हलर ऍम्बुलन्स गाडी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. ऑल इंडिया स्टँडर्ड १२५ प्रमाणे फुल्ली फिटेड आहे. गाडीत रूग्णांसाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे बसविण्याची सुविधा केलेली आहे. रूग्णांच्या ने आणीसाठी फोल्डेबल ट्रेचर कम ट्रॉली गाडीसोबत उपलब्ध करून दिली आहे.