पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कोरोनाची लस घेतली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कोरोनाची लस घेतली आहे. नवी दिल्लीमधील AIIMS मध्ये ही लस त्यांनी घेतली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस त्यांनी घेतली आहे. सिस्टर पी. निवेदा यांनी त्यांना ही लस दिली.
देशात आजपासून करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होणार आहे. तसंच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरण मोहिमेत सहभागी झाले असून सर्वात प्रथम करोनाची लस घेतली आहे. मोदींनी लस घेतानाचा फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे.
मोदींनी ट्विटरला फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे. “एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com