स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गत रत्नागिरी शहरातील सर्व शाळांमध्ये स्वच्छतेचे संदेश देणारे जिंगल, शोर्ट फिल्म, रांगोळी, पोस्टर/चित्रकला निबंध इ. स्पर्धांचे आयाेजन
केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान (नागरी) संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर दि. १५ मे २०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानांतर्गत शहरे हगणदारीमुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापन करणे या दोन मुख्य बाबींचा समावेश आहे.
सदर अभियानांतर्गत रत्नागिरी शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२१ राबविणेत येत आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी शहरातील सर्व शाळांमध्ये स्वच्छतेचे संदेश देणारे जिंगल, शोर्ट फिल्म, रांगोळी, पोस्टर/चित्रकला निबंध इ. स्पर्धा १८ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत नगर परिषदेमार्फत राबविणेत येत आहे. सदर स्पर्धेमध्ये १ ते ५ वी छोटा गट, ६ वी ते १० वी मध्यम गट आणि त्यापुढे खुला गट अशा प्रकारे वर्गवारी करणेत आली आहे. प्रत्येक गटातील ३ स्पर्धकांना नगर परिषदेकडून गौरविण्यात येणार आहे.
तरी स्वच्छतेच्या या कार्यक्रमांत सर्वांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा.
वरील दिलेल्या ऍक्टीव्हिटीचा फोटो, तुमचं नाव, मोबाईल नंबर, वय आणि इयत्ता खालील दिलेल्या नंबरवर व्हॉटसऍप करावे.
१) वारीशे – ९६०७२४६९४१
२) लोखंडे – ९१६८०२३४०३, ९२८४४६०७८३
www.konkantoday.com