देशात कोविड-१९ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत केवळ सात हजार ५८० जणांवर विपरीत परिणाम
देशात कोविड-१९ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर ३१ जानेवारीपर्यंत केवळ सात हजार ५८० जणांवर विपरीत परिणाम झाल्याचे आढळले असून हे प्रमाण एकूण लसीकरणाच्या केवळ ०.२ टक्के इतकेच आहे, असे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत सांगितले.
लसीकरण मोहिमेअंतर्गत ३१ जानेवारीपर्यंत ज्यांना लस टोचण्यात आली, त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला असला तरी त्याचा लसीकरणाशी संबंध आढळलेला नाही, असेही हर्षवर्धन यांनी कोविड-१९ लसीच्या विपरीत परिणामांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
www.konkantoday.com