माझी वसुंधरा अभियाना’ अंतर्गत पालिकेच्या आवारात इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘चार्जिंग स्टेशन’ (पॉइंट) उभारण्यास मंजुरी
रत्नागिरी नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ‘माझी वसुंधरा अभियाना’ अंतर्गत पालिकेच्या आवारात इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘चार्जिंग स्टेशन’ (पॉइंट) उभारण्यास मंजुरी देण्यात आली. या अभियानांतर्गंत चार्जिंग पॉइंटचे जाळे उभारण्यात येणार आहे. नवीन धोरणानुसार कोणीही चार्जिंग स्टेशन उभारू शकणार आहे. पालिकेला त्यासाठी महिन्याला सुमारे २ हजार रुपये वीज बिलापोटी भरावे लागणार आहेत.
‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. यामुळे पालिकेला व इतरांना उत्पन्नाचा नवा स्रोत मिळणार आहे.
www.konkantoday.com