कोरोना संकट काळात संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन केलेल्या वरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय
कोरोना संकट काळात संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अनिल देशमुख यांनी ट्विटरवर याबाबतमी माहिती दिली आहे
सुरुवातील कडेकोट संचारबंदी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर जसजशी कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत गेली तसतशा लोकांना अनेक गोष्टींसाठी सूट देण्यात आली. मात्र, या काळात अनेकांनी नियमांचं उल्लंघन केलं. अनेकजण संचारबंदीच्या नियमांना धाब्यावर बसवून घराबाहेर पडले. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या विरोधात कठोर कारवाई केली होती.
लॉकडाउनच्या काळातच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.
राज्यभरात भारतीय दंड विधान कलम १८८ अंतर्गत सुमारे २ लाख ७० हजार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
www.konkantoday.com