
काळे भगिनींच्या राज्यस्तरीय तायक्वांदोत डंका
रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतील काळे बहिणींनी दैदीप्यमान यश मिळवले. या राज्यस्तरीय स्पर्धेत श्रृती काळे हिने तीन सुवर्णपदकांची तर ओवी आळे हिने चार सुवर्णपदकांची कमाई केली.रत्नागिरीत राज्यस्तरीय ओपन स्टेट तायक्वांदो क्योरूगी व पूमसे चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन आणि युवा तायक्वांदो मार्शल आर्ट रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा २९, ३० एप्रिल आणि १ मे रोजी रॉयल बँक्वेट हॉल रत्नागिरी येथे घेण्यात आली. या स्पर्धेत राज्यभरातील सातारा, मुंबई, पुणे, सांगली आदी नामांकीत जिल्ह्यातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.www.konkantoday.com