
सह्याद्री निसर्ग मित्र यांच्यावतीने व डाऊ केमिकल इंटरनॅशनल आणि चिपळूण नगरपरिषदेच्या सहकार्याने प्लास्टीक कचरा मुक्त चिपळूण मोहीम
आघाडीची सार्वजनिक संस्था सह्याद्री निसर्ग मित्र यांच्यावतीने व डाऊ केमिकल इंटरनॅशनल आणि चिपळूण नगरपरिषदेच्या सहकार्याने प्लास्टीक कचरा मुक्त चिपळूण ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदर मोहिमेमध्ये पहिल्या टप्प्यात दुधाच्या प्लास्टीक पिशव्या लावण्यात येणार आहेत. दूध ओतून घेतल्यानंतर सदर पिशव्या कचर्यात व पर्यायाने डंपिंग ग्राऊंडवर जाऊन पडतात. संस्थेच्यावतीने सदर पिशव्या प्रत्येक चहाचे दुकान, हॉटेल, टपरी तसेच शहरातील गृहसंकुले, वैयक्तिक घरे येथून गोळा केल्या जातील. जेणेकरून त्या कचर्यात पडणारच नाहीत, यासाठी संस्थेने प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले असुन सर्व व्यावसायिक तसेच गृहप्रकल्प यांच्याजवळ चर्चा केली असून ते सर्वांनी या मोहिमेला पाठिंबा देत रिकाम्या दुधाच्या पिशव्या कचर्यात न टाकता संस्थेच्या संकलनात जमा करण्याची तयारी दाखवली आहे. सह्याद्री निसर्ग मित्रच्यावतीने दररोज सकाळी संपूर्ण चिपळूणमध्ये फिरून या पिशव्या जमविण्यासाठीची व्यवस्था केली आहे. सदर जमा केलेल्या प्लास्टीक पिशव्या रिसायकलींगसाठी पाठवण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com