बनावट नेमणूकपत्र प्रकरणी मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथाजिल्हाधिकाऱ्यांचा बनावट शिक्का व स्वाक्षरी तयार करुनजिल्हा परिषदमध्ये हजर होण्यासाठी गेलेल्या तरूणाला अटक
केल्यानंतर आता या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार व एका राजकीय पक्षाचा
माजी पदाधिकारी अंजिक्य नाईक असल्याचे उघड झाले आहेत.
त्यानेच एक लाखात त्याला बनावट नियुक्तीपत्र दिलेहोते.अंजिक्य नाईक (२८ रा.एकता अपार्टमेंट) ला शहर
पोलीसांच्या पथकाने अटक केली असून त्याच्यासह सौरभ पवार
याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशन्यायायालयाने दिले आहेत.बनावट नियुक्ती पत्राच्या आधारे कनिष्ठ प्रशासक अधिकार्यांकडेहजर होण्यासाठी गेलेल्या सौरभ किशोर पवार (रा. केळवी,ता.राजापूर,जि.रत्नागिरी) शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर
पोलीसांनी त्याला अटक केली होती.
www.konkantoday.com