अवैध वाळू वाहतुकदारांना महसूलचा दणका
मंडल अधिकारी सचिन गवळी आणि त्यांचे सहकारी सुशिल परिहार यांनी रात्रीच्या वेळी आबलोली परिसरात अवघ्या दोन तास वाळूच्या पाच गाड्या पकडल्या असून सदर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू असून एकूण २ लाख १ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. सदर वाहनचालकांनी ही वाळू रत्नागिरी तालुक्यातील राई येथून आणल्याचे सांगितले आहे.
www.konkantoday.com