कोल्हापूर विमानतळावरून आता कार्गो सेवाही (मालवाहतूक) सुरू होणार
गेली दोन वर्षे नियमित प्रवासी विमानसेवा देणार्या कोल्हापूर विमानतळावरून आता कार्गो सेवाही (मालवाहतूक) सुरू होणार आहे. येत्या गुरुवारपासून ही वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवासी विमानातूनच पाचशे किलोपर्यंतच्या मालाची वाहतूक केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
दोन वर्षांपासून कोल्हापूर विमानतळावरून उडान योजनेंतर्गत नियमित प्रवासी विमानसेवा सुरू आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
www.konkantoday.com