
पावस खरेदी-विक्री केंद्राच्या हिशोबात अफरातफर, अडीच लाखांचा अपहार
रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील खरेदी-विक्री केंद्राच्या हिशोबात अफरातफर करून सुमारे २ लाख ३४ हजार ५२० रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी किरण कमलाकर पावसकर, आर्यन किरण पावसकर (दोघेही रा. पावस बौद्धवाडी, रत्नागिरी) या दोघांविरोधात पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना २ फेब्रुवारी ते १२ जुलै या कालावधीत घडली असून याबाबत शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com