
बॉक्साईट मायनिंगच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत जनसुनावणीचे आयोजनाचे वेळी सभामंडपात विरोधक व समर्थक यांचा प्रचंड गदारोळ – पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
दापोली तालुक्यातील मांदिवली येथील मांदिवली बॉक्साईट भूखंड या बॉक्साईट मायनिंगच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत दि. १८ ऑक्टोबर रोजी मांदिवली येथे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणीचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या जनसुनावणीच्या वेळी मांदिवली पंचक्रोशीतील प्रकल्पाच्या विरोधात असलेले ग्रामस्थ व समर्थनार्थ असलेल्या ग्रामस्थ यांनी सभामंडपात प्रचंड गदारोळ केला, दोन्हीकडून घोषणाबाजी करण्यात आल्या. पोलिसांना वारंवार मध्यस्थी करून देखील हा गदारोळ कायम राहिल्याने अखेर अध्यक्षांनी हि जनसुनावणी तुर्तास्थ स्थगित केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कोल्हापुरचे अधिकारी जगन्नाथ साळुंखे, प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूणचे अधिकारी श्री. जिरापुरे, दापोलीचे तहसीलदार अर्चना भोंबे, मंडणगडचे तहसीलदार तानाजी शेजाळ आदी अधिकारी उपस्थित होते.मांदिवली येथे प्रस्थावित असलेल्या बॉक्साईट मायनिंग प्रकल्पाला विरोधात असलेल्या विरोधकांनी घोषणाबाजी करत सभास्थानी मोर्चा आणला, मांदिवली बचाव, बॉक्साईट हाटाव या घोषणा देत सभामंडपात गोंधळ घातला. सभाअध्यक्षांनी सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपले म्हणणे मांडण्याची व निवेदन देण्याची सूचना केली. आपले सर्वांचे म्हणणे रेकोर्डवर घेतले जाईल शिवाय आपल्या सर्वांच्या निवेदनाचा विचार केला जाईल असे सूचित करूनही विरोधक व मायनिंग समर्थक यांचा गदारोळ थांबला नाही. विरोधकांनी आपल्या भूमिकेत मांदिवली गावा जवळील रोहिले व उंबरशेत येथील बॉक्साईट मायनिंग प्रकल्पाचे दाखले देत मायनिंग मुळे धुळीने होणारे प्रदूषण व रस्त्याची होणारी दुरवस्था होत असल्याचे सांगून आपला विरोध कायम ठेवला तर मायनिंग समर्थक यांनी स्थानिक पातळीवर मायनिंग प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होण्याबरोबर स्वामित्व धनापोटी मिळणाऱ्या निधीतून परिसराचा विकास साद्य होऊ शकतो अशी भूमिका मांडली
www.konkantoday.com